mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्यात एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे संकल्प सप्ताहास प्रारंभ : Resolve towards Thalassemia Liberation

शेअर करा :

Resolve towards Thalassemia Liberation : थॅलेसेमिया या आनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानांतर्गत संकल्प सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


बुलढाणा : थॅलेसेमिया या आनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानांतर्गत संकल्प सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हाभरातील आरोग्य संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.

हे अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अभियानाच्या एक वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्याचा आरोग्य विभाग अधिक सक्रिय झाला असून, थॅलेसेमिया मुक्त समाजाचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक स्तरावर जनजागृती केली जात आहे.

या सप्ताहाच्या अनुषंगाने नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, कारंजा चौक, बुलढाणा येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना आणि लाभार्थ्यांना थॅलेसेमिया या आजाराचे गांभीर्य समजावून सांगण्यात आले.

थॅलेसेमिया हा आनुवंशिक आजार असून तो पिढ्यानपिढ्या कसा संक्रमित होतो, याची माहिती देण्यात आली. हा आजार रोखण्यासाठी विवाहपूर्व तपासणी (Pre-marital screening) किती आवश्यक आहे, यावर तज्ज्ञांनी भर दिला. कार्यक्रमादरम्यान संशयित लाभार्थ्यांची तत्काळ ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ करण्यात आली.

 

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ हाच मंत्र

“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत थॅलेसेमिया मुक्तीसाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे. केवळ उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर केलेली तपासणी थॅलेसेमियाचा प्रसार रोखू शकते. या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top