mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मुलीचा विनयभंग वृद्ध नराधमास कारावास : Imprisonment for Elderly Monster for Molesting Girl

शेअर करा :

Imprisonment for Elderly Monster for Molesting Girl : मुलीचा विनयभंग वृद्ध नराधमास कारावास 

Imprisonment for Elderly Monster for Molesting Girl
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बुलढाणा : बारावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडखानी केल्याप्रकरणी ६९ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अकबर शेख जाफर शेख यांनी एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रंगनाथ सखाराम घुबे असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील रहिवासी असलेला आरोपी रंगनाथ हा १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी साडेआठ वाजता बारावर्षीय पीडित मुलीच्या घरात शिरला. घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिची आजी धावत आली आणि मुलीची सुटका केली. मुलीचे आई, वडील घरी परतल्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

या प्रकरणी गुन्हे नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली. सीआरपीसीचे कलम १६४ प्रमाणे चिखली येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुलीचे बयाण नोंदविण्यात आले. सखोल तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ, ४५२, ३४३ व पोस्को ॲक्टचे कलम ८ व १२ प्रमाणे विद्यमान न्यायालयात दोषारोप करण्यात आला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी जिल्हा सरकारी वकील वसंत एल. भटकर यांनी सहा साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिचे वडील व आजी तसेच घटनास्थळ पंच व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे ॲड. वसंत एल. भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश १ अकबर शेख यांनी भादंवि कलम ४५२ नुसार आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास, असा निर्णय दिला. पीडितेस आर्थिक सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने निकालाबाबत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणास कळविण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top