voter awareness : राष्ट्रीय मतदारदिनाचे औचित्य साधून ३० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल रॅली काढून अनोखी मतदार जागृती करण्यात आली.

अनोखा राष्ट्रीय मतदारदिन
बुलढाणा : राष्ट्रीय मतदारदिनाचे औचित्य साधून ३० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल रॅली काढून अनोखी मतदार जागृती करण्यात आली.
मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फिट इंडिया उपक्रमांतर्गत बुलढाणा सायकलिंग क्लबच्या वतीने ३० हा उपक्रम राबविण्यात आला.
या सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. या रॅलीला सायकलप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या सायकल रॅलीत नायब तहसीलदार संजय बनगाळे, बुलढाणा सायकलिंग क्लबचे अध्यक्ष दीपक क्यावल, सरदार सिंग ठाकूर, नितीन देशमुख, संतोष सानप (देऊळगाव मही), विद्या सानप (देऊळगाव मही), जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड तसेच लेखा अधिकारी विष्णू गाडे हे सहभागी झाले होते.

सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलस्वारांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

