mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

खळबळजनक! आदिवासीबहुल नागेशवाडीत घरोघरी पसरला डायरिया : Diarrhea spreads from house to house in tribal-dominated Nageshwadi

शेअर करा :

Diarrhea spreads from house to house in tribal-dominated Nageshwadi : तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाण्याने डायरीयाची साथ पसरली आहे. घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत असून, सध्या शंभरावर रुग्णांची नोंद झाली आहे.


Diarrhea spreads from house to house in tribal-dominated Nageshwadi
घरामध्ये सलाईनद्वारे उपचार घेताना महिला

शंभराहून अधिक रुग्ण : आदिवासीबहुल गावात खळबळ : खासगी डॉक्टरकडून उपचार : आरोग्य विभागाने घेतले पाण्याचे नमुने : शिबिर मात्र लावले नाही


आसिफ शाह


मेहकर : तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाण्याने डायरीयाची साथ पसरली आहे. घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत असून, सध्या शंभरावर रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, १४ मे रोजी आरोग्य पथक गावात दाखल झाले. पथकाने पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले. मात्र, उपचारासाठी गावात कॅम्प लावला नसल्याने खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करावे लागत असल्याची ओरड गावकऱ्यांकडून केली जात आहे. आरोग्य विभागाने वेळीच ही साथ आटोक्यात आणली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते, असे लोक बोलत आहेत.

Diarrhea spreads from house to house in tribal-dominated Nageshwadi
पाण्याचे स्त्रोत तपासताना आरोग्य कर्मचारी

 

मेहकर तालुक्यातील आदिवासीबहुल अशा नागेशवाडीमध्ये मागील काही दिवसांपासून डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. घरोघरी असणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे. संडास, उलट्यांच्या त्रासामुळे गावकरी खासगी डॉक्टरकडे उपचार करवून घेत आहेत. गावात डायरियाची लागण झाल्याची माहिती राजेश नवले यांनी दिल्यानंतर १४ मे रोजी आरोग्य विभागाच्या सीएचओ डॉ. गवळी मॅडम. आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांनी यांनी नागेशवाडी येथे जाऊन पाण्याच्या स्त्रोताची माहिती घेतली. काही रुग्णांना औषधी दिली आणि पाण्याचे नमुने घेतले. मात्र मोठ्या प्रमाणावर डायऱ्याची लागण झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कॅम्प लावण्यात आले नाहीत. ज्याला पाहता दिवसेंदिवस डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत.

प्रत्येक गावात अशा सेविका व आरोग्य सेवक, सेविका नेमून दिलेल्या असतात. मागील काही काळापासून नागेशवाडीमध्ये डायरियाची लागण पसरली आहे. याची माहिती आरोग्य विभागाला नसणे ही शोकांतिका आहे. आरोग्य विभाग ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही का? शासनाने त्यांना नेमून दिलेल्या गावांमध्ये हे आरोग्य विभागाचे कर्मचारी न पोहाचताच मुख्यालयी फेस रीडिंग करून पगार काढत असल्याचा आरोप होत आहे.

घाटबोरी गट ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या टेंभूखेड, नागेश वाडी या गावांना टेंभूखेड धरणाजवळील विहिरीवरून सरळ हे पाणी गावानजीकच्या विहिरीमध्ये सोडले जाते. कोणत्याही प्रकारे फिल्टर नसलेले पाणी गावकरी पितात. अशातच नागेश वाडीमध्ये डायरीयाची लागण झाली. नागेश वाडी येथे डायरियाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही नागेश वाडी येथे जाऊन पाहणी केली. रुग्णांना औषधी दिली तसेच पाण्याचे नमुने घेतले.

डॉ. गवई, समुदाय आरोग्य अधिकारी

 

आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका ह्या जर नियमित गावात गेल्या व घरोघरी भेटी दिल्या तर अशाप्रकारे मागील कित्येक दिवसापासून जी डायरी याची लागण झालेली आहे त्याची माहिती आरोग्य विभागाला मिळालीच असती. मात्र तसे झाले नाही आरोग्य विभागाला माहिती द्यावी लागली तर आरोग्य विभागाने नियमित पाण्याचे नमुने घ्यायला हवेत. पाण्याचे नमुने घेतले असते तर वेळीच ग्रामपंचायतला कळवले असते की गावात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

शीतल राजेश नवले

ग्रामपंचायत सदस्य

 

सध्या नागेश वाडी मध्ये घरोघरी डायरीयाचे रुग्ण असून खाजगी डॉक्टर याच्यावर उपचार करत आहेत प्रत्येक घरात एक किंवा दोघाला सलाईन लागलेले आहेत.

 

मारुती पूंजाजी डाखोरे

सामाजिक कार्यकर्ते, नागेश वाडी. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top