Young man took poison at the gate of the police station : कौटुंबिक वादातील प्रकरणात डोणगाव ठाणेदार कारर्वा करीत नसल्याने रोष व्यक्त करीत एका तरुणाने पोलीस स्टेशनसमोरील गेटवरच विष प्राशन केले.

कौटुंबिक वादात कारवाई होत नसल्याबद्दल संताप
डोणगाव : कौटुंबिक वादातील प्रकरणात डोणगाव ठाणेदार कारर्वा करीत नसल्याने रोष व्यक्त करीत एका तरुणाने पोलीस स्टेशनसमोरील गेटवरच विष प्राशन केले. १९ मेच्या सकाळी ११ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच पकडून त्याला रुग्णालयात भरती केले.
डोणगाव येथील साजन शाह अब्दुल शाह या युवकाचा पत्नीसोबत वाद होता. त्याने डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र, कारवाई होत नसल्याने तरुण संतप्त झाला होता. अखेर त्याने १९ मे रोजी सकाळी अकरा वाजता डोणगाव पोलीस स्टेशन गोठून गेटसमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी या युवकाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. नंतर त्याला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले.
या युवकाचे म्हणणे आहे की, मी माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कैफियत दिली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिले जात होती. याला कंटाळून मी विषारी औषध प्राशन केले, असे त्याचे म्हणणे आहे.
साजन शाह याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद होते. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल असून त्याच्या सासरच्या विरुद्ध कारवाईसाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु याला विलंब होत असल्याचे मनात राग धरून या युवकाने विष प्राशन केले.
अमरनाथ नागरे, ठाणेदार, डोणगाव.


