mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

कानून के हाथ लंबे होते है : Kanun ke hand long hote hai

शेअर करा :

Kanun ke hand long hote hai… : वाशीम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्दपासून जवळच उतावळी नदीच्या पुलावर २० मे रोजी सायंकाळी मालेगावकडे जात असलेल्या मोटारसायकलस्वारास एका पिकअपने उडवून चालक पसार झाला. या अपघातात एक युवक ठार, तर एक गंभीर जखमी झाला होता.


मोटारसायकलस्वारास उडवून पळालेले पिकअप अखेर लागले हाती; शिरपूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील ३२ सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून लावला छडा


प्रभाकर नाईकवाडे


Kanun ke hand long hote hai...
पोलिसांनी जप्त केलेला पिकअप

पिंप्री सरहद्द : वाशीम जिल्ह्यातील पिंप्री सरहद्दपासून जवळच उतावळी नदीच्या पुलावर २० मे रोजी सायंकाळी मालेगावकडे जात असलेल्या मोटारसायकलस्वारास एका पिकअपने उडवून चालक पसार झाला. या अपघातात एक युवक ठार, तर एक गंभीर जखमी झाला होता. मात्र पिकअप वाहनाचा काहीच तपास लागला नव्हता. यावर वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व त्यांच्या टीमने सात दिवसांमध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे पिकअप व आरोपी वाहन पकडून चालक अटक केली.

२० मे च्या सायंकाळी साडेचार वाजता दरम्यान वाशिम जिल्ह्याच्या पिंप्री सरहद्द गावाजवळ उतावळी पुलावर मालेगावकडे जाणारे राधेश्याम इंगळे व संतोष शिंदे यांना मालेगावकडून येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने उडवले. यामध्ये राधेश्याम इंगळेचा जागेवरच मृत्यू झाला होता. शिरपूर पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघ व पोलीस उपनिरीक्षक पठाण, हेड कॉन्स्टेबल बालाजी, गुरुदेव, सतीश व मनोज यांनी बुलढाणा जिल्हा गाठून सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली. अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाचा ठावठिकाणा लावला. ज्यामध्ये एमएच-२८-बीबी-४५५३ व त्याचा चालक गजानन सुरेश वाघ रा. पळसखेड चक्का, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा याला अटक केली. तसेच पिकअप वाहन जप्त करून मेहकर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले.

शिरपूर पोलीस स्टेशनच्या दमदार कामगिरीने सिद्ध केले की ‘कानून के हाथ लंबे होते है…’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top