mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

घर बांधकामाची भिंत कोसळून सासरे-जावई ठार : Father-in-law and son-in-law killed after wall collapses

शेअर करा :

Father-in-law and son-in-law killed after wall collapses : घराच्या निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करीत असतानाच अंगावर भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने मिस्त्री काम करणाऱ्या सासरा व जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे गुरुवार, २८ मे रोजी रात्री ही दुर्घटना घडली.


Father-in-law and son-in-law killed after wall collapses

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील दुर्घटना

खामगाव : घराच्या निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करीत असतानाच अंगावर भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने मिस्त्री काम करणाऱ्या सासरा व जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे गुरुवार, २८ मे रोजी रात्री ही दुर्घटना घडली.

मुकद्दर खान जमशद खान (वय ७४) व शेख युसुफ शेख बिस्मिल्ला (वय ३८) अशी मृत सासरे-जावयाची नावे आहेत. दोघेही पिंपळगाव राजा येथील रहिवासी होते. घराचे बांधकाम करताना भिंती उभारल्या होत्या. २८ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोघेही बांधकामाची पाहणी करीत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. भिंत कोसळताच एकच ओरड झाली आणि ग्रामस्थ मदतीला धावले. मलब्याखालून दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने पिंपळगाव राजा गावावर शोककळा पसरली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top