mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : Horrific accident on the Samruddhi Mahamarg

शेअर करा :

Horrific accident on the Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: इरटिका आयशरला धडकून एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Horrific accident on the Samruddhi Mahamarg


आसिफ शाह : 

 डोणगाव : समृद्धी महामार्गावर ७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका इरटिका कारने आयशर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात इरटिका कारमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालकाने इरटिका कारला सुमारे २ ते ३ किलोमीटर फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, ज्यामुळे अपघाताची भीषणता अधिकच वाढली.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २७३ वर हा अपघात घडला. नागपूरहून नाशिककडे जाणारा एमएच १५ बीपी ७६६५ क्रमांकाचा आयशर ट्रक जात असताना, त्याच्या पाठीमागून आलेल्या एमएच २९ बीपी ५५४३ क्रमांकाच्या इरटिका कारने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इरटिका कारचे बोनेट आयशर ट्रकमध्ये पूर्णपणे घुसले.

या अपघातात इरटिका कारच्या चालकाच्या बाजूला बसलेला कृष्णा राठोड (वय ३०, रा. मानोरा, जि. वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला. तर, मानोरा येथील राहुल पवार गंभीर जखमी झाले. याव्यतिरिक्त, इरटिका कार चालक सत्यपाल राठोड आणि कार्तिक अरुण जाधव हे देखील जखमी झाले आहेत.

अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमींना समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेने मेकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इरटिका आणि आयशरचा अपघात झाल्यानंतर इरटिकाचे बोनेट आयशरच्या मागे पूर्णपणे अडकले होते. या स्थितीतही आयशर चालकाने इरटिकाला सुमारे दोन ते तीन किलोमीटर फरफटत नेले. इरटिका कारची अपघातानंतरची स्थिती आणि तिच्या टायरची अवस्था पाहता, आयशर चालकाने तिला किती दूरपर्यंत ओढत नेले असेल, याची कल्पना येते. महामार्ग पोलीस घटनास्थळी येण्याची चाहूल लागताच आयशर चालक पळून गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top