mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक गंभीर जखमी : Horrific accident on Samruddhi Mahamarg; driver critically injured

शेअर करा :

Horrific accident on Samruddhi Mahamarg; driver critically injured : समोरील आयशर ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रेलर मागून धडकल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांची अवस्था छिन्नविच्छिन्न झाली. नागपूर ते मुंबई मार्गावर चॅनल क्रमांक २८७.२०० मुंबई कॉरिडोरवर फर्दापूरजवळ १२ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.


Horrific accident on Samruddhi Mahamarg; driver critically injured
धडकेनंतर वाहनांची झालेली विचित्र अवस्था

आयशर चालकाने ब्रेक मारल्याने ट्रेलर मागून धडकला : मदतीला उशीर झाल्याने संताप


आसिफ शाह


मेहकर : समोरील आयशर ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रेलर मागून धडकल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांची अवस्था छिन्नविच्छिन्न झाली. नागपूर ते मुंबई मार्गावर चॅनल क्रमांक २८७.२०० मुंबई कॉरिडोरवर फर्दापूरजवळ १२ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

समृद्धी महामार्गावर हा अपघात घडल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्याने जखमी चालकासह अन्य वाहनधारकांनी प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला.

Horrific accident on Samruddhi Mahamarg; driver critically injured
क्षतिग्रस्त आयशर

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील प्रतापगड येथील रहिवासी चालक वसीम अहमद (वय ४०) हा ट्रेलर (क्रमांक एमएच ४६ डीसी ११५२ ) घेऊन नागपूर येथून मुंबईला जात होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबई कॉरिडोरवर चॅनेल क्रमांक २८७.२०० जवळ समोरील आयशर ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रेलर आयशरला मागून धडकला. अपघातामध्ये ट्रेलर चालक वसीम यास किरकोळ जखमी झाला. त्याला मेहकर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मेहकर समृद्धी महामार्ग उपकें उपकेंद्राचे API इंगळे हे पावणेसहा वाजता आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्षतिग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून बॅरिकेटिंग लावण्यात आले. नंतर वाहतूक सुरळीत सुरू आहे.

यंत्रणा कुचकामी 

अपघात घडल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्याने समृद्धी महामार्गावर टोल फ्री नंबर, ॲम्ब्युलन्स सेवा, पोलीस फक्त नावापुरतेच का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चालकाच्या सांगण्यानुसार, हा अपघात पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान घडला. मात्र अपघातानंतर वेळेत मदत न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर खान यांनी व वाहन चालकांनी वेळीच मदत केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top