mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सोळावर्षीय मुलीवर बलात्कार : Rape of a 16-year-old girl

शेअर करा :

Rape of a 16-year-old girl : सोळावर्षीय मुलीवर बलात्कार

Rape of a 16-year-old girl


दोन तासांतच आरोपीला अटक 

मेहकर : जानेफळ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात गावातीलच ३२ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीस घरात ओढून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ९ जूनच्या दुपारी दोन वाजता उघडकीस आली. पोलिसांनी तत्परता दाखवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक केली.

मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी ही ९ जुनच्या पहाटे पाच वाजेदरम्यान गावाशेजारीच असलेल्या गोठ्यातून घर सारवण्यासाठी शेण आणायला गेली. त्याचवेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या ३२ वर्षीय युवकाने अंधाराचा फायदा घेत त्या परिसरामध्ये कोणीही नसल्याचे पाहून मुलीस घरात ओढून नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेची माहिती तिने आईला दिल्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. जानेफळचे ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी युवक विष्णू बबन बोराडे (वय ३२) याला सायंकाळी चार वाजता वरवंड शेतशिवारांमधून अटक केली.

ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोहेकॉ पंढरीनाथ काकड, पोलीस अंमलदार लक्ष्मण पिटकर, पोलीस शिपाई नीता पवार, अमोल अंभोरे यांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top