mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

neglected heirs of folk art : लोककलेच्या उपेक्षित वारसदारांचा आक्रोश

शेअर करा :

neglected heirs of folk art : लोककला वाचविण्यासाठी लोककलेच्या शेकडो वारसदारांनी मंगळवार, २७ जानेवारीला पदयात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आक्रोश व्यक्त केला.

आक्रोश मोर्चात आपल्या परंपरेचे वेशभूषेसह प्रदर्शन करताना लोककलावंत.

बुलढाणा : लोककला जिवंत ठेवणाऱ्या लोककलावंतांना सरकारी अनास्थेमुळे उपेक्षेचे जीवन जगावे लागत आहे. लोककला वाचविण्यासाठी लोककलेच्या शेकडो वारसदारांनी मंगळवार, २७ जानेवारीला पदयात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आक्रोश व्यक्त केला. लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, ही मागणी घेऊन या लोकांनी सरकारचे लक्ष वधले.
चिखली रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेकडो लोककलावंत, निराधार आणि दिव्यांगांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला. पारंपरिक वेशभूषा करून लोककलावंत सहभागी झाले. विविध कलागुण सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून मायबाप सरकार आमच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा लोककलावंत देत होते. आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, जिल्ह्यातील कलावंत नोंदणीची संख्या शंभरवरून दोन हजार करण्यात यावी, लोककलावंतांचा दहा लाखांचा विमा काढण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. मागण्यांची पूर्तता न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर यांनी दिला.


आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
लोकशाही मार्गाने निवेदने देऊन, विनंती करून आम्ही आमचा हक्क मागितला आहे. परंतु त्याकडे सत्ताधारी यंत्रणेने वेळोवेळी दुर्लक्ष केले. त्यामुळे आज पदयात्रा काढून जनआक्रोश करण्यात आल्याचे बोरकर यावेळी म्हणाले. ३ फेब्रुवारीला मेहकर पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top