mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रानडुकराची शिकार, पाच शिकाऱ्यांना अटक : Wild boar hunting: Five hunters arrested.

शेअर करा :

Wild boar hunting: Five hunters arrested. : रानडुकराची शिकार, पाच शिकाऱ्यांना अटक

Wild boar hunting: Five hunters arrested.


बुलढाणा : रानडुकराची शिकार करून मांस घेऊन जाणाऱ्या पाच आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून शस्त्रासह पकडण्यासाठी वापरलेला फास जप्त केला आहे. अमडापूर बीटमधील किन्ही नाईक ते धोत्रा नाईक पांदण रस्त्यावर १४ जूनला ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक उपवनसंरक्षक वैभव काकडे, बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

उदयनगर वर्तुळाचे वनपाल आर.बी. नेवरे, यांच्यासह वनरक्षक गवारगुरु, एम.डी. गवळी, वनरक्षक, बी.के. पवार, रोजंदारी मजूर सुरेश, रामलोडे यांनी अमरापूर बीट कंपार्टमेंट नंबर ६०७ मधील धोत्रा नाईक ते किन्ही नाईक पांदण रस्त्यावर १४ जूनच्या सायंकाळी सापळा रचला. काही संशयितांची तपासणी केली असता शिकाऱ्यांजवळ वायरच्या थैलीत मांसाचे तुकडे आढळून आले. रानडुकराचे हे मांस असल्याचे आरोपींनी सांगितल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या आरोपींच्या ताब्यातून शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र व फास जाळे ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध रानडुक्कर शिकारप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला. १५ जून रोजी आरोपींना चिखली येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या कारवाईत गुमी वर्तुळाचे वनपाल बकाल, एम.डी. गवळी, बी.के. पवार, नितेश गवई, गजानन शिंदे, समाधान शिंदे, आकाश शिंदे, कपिल मोरे, एस.एस. गायके, दत्ता कुदर हे वनरक्षक व रोजंदारी कर्मचारी सुरेश लोडे व राम लोडे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वर्तुळ अधिकारी आर.बी. नेवरे हे करीत आहेत.

 

अटकेतील शिकाऱ्यांची नावे

रघुनाथ जगदेव तुमराम (वय ३७, धोत्रा नाईक), नारायण राघू इंगळे (वय ६६, वडाळी) दगडू पांडुरंग ढंगारी (रा. वडाळी), रामेश्वर वामन शिंदे व केशव भास्कर चौरे (रा. हिवरा नाईक) अशी अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top