mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धीवरील अपघातात डॉक्टर पती-पत्नीचा मृत्यू : Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway

शेअर करा :

Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway :समृद्धीवरील अपघातात डॉक्टर पती-पत्नीचा मृत्यू

Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway


मुला – मुलीसह चालक गंभीर जखमी
समोरील ट्रकला फॉर्च्यूनर मागून धडकली 

आसिफ शाह

मेहकर : समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडोरवर चॅनल क्रमांक ३२६.५ वर २३ जूनच्या सकाळी सहा वाजता दरम्यान फॉर्च्युनर ला भीषण अपघात झाला. भरधाव कार ट्रकच्या पाठीमागून धडकल्याने छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे डॉ. सय्यद आसिफ व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगा व मुलगी दोन्ही गंभीर जखमी झाले. सोबतच कारचालकसुद्धा जखमी झाला.

Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ जूनच्या सकाळी सहा वाजता दरम्यान चॅनल क्रमांक ३२६.५ मुंबई कॉरिडोवर अपघात झाला, अशी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोळंके, आराख, राठोड, चौधरी, शेख नासिर, बारगजे हे घटनास्थळी पोहोचले. ट्रक क्रमांक एनएल ०१ एडी ४९८१ ला एमएच २० एचएन ६७६८ क्रमांकाची फॉर्च्यूनर कार मागून धडकली. मध्यम लेनवर अपघातग्रस्त उभे दिसले. ट्रक चालक मोहम्मद इजराऊल हक राहणार झारखंड यास त्यांनी विचारपूस केले असता त्याने सांगितले की तो ट्रक घेऊन नागपूर वरून मुंबईकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्यूनर चालकाने सदरील ट्रकला पाठीमागून जबर धडक दिली.

Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway


अपघातात कारमधील डॉक्टर सय्यद असिफ सय्यद उमर (वय ५२), गुलसितानबी सय्यद असिफ (वय ४५) यांना गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चालक शेख साजिद शेख फरीद, मुलगी नबा सय्यद आसिफ ( वय १८), सय्यद अजब माज सय्यद असिफ (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली. जखमींना सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जालना येथे पाठविण्यात आले. दोन्ही मृतक यांना ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे ॲम्बुलन्सने पाठविण्यात आले. अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला घेऊन दुसरबीड टोल नाका येथे लावण्यात आले.

Doctor couple dies in accident on Samruddhi Expressway

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top