Child marriage prevented : बालविवाह रोखला
मुहूर्तवेळेआधीच आधीच घातली धाड

बुलढाण्याच्या शिक्षक कॉलनीत चाइल्ड हेल्पलाइन, पोलिसांची संयुक्त कारवाई
बुलढाणा : शहरातील चांडक लेआऊटजवळील शिक्षक कॉलनीत २३ जूनला सायंकाळी सहा वाजता लागणारा सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाइल्ड हेल्पलाइन व बुलढाणा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत मुहूर्ताआधीच पोहोचून रोखला.
बुलढाणा तालुक्यातील एका गावामधील मुलीचा बालविवाह २३ जून रोजी सायंकाळी लावण्यात येत होता. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, प्रकल्प समन्वयक शेख सोहेप तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइन १०९८ च्या बुलढाणा समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई, मुकेश मोरे, राहुल सुरडकर यांनी तातडीने गांभीर्य लक्षात घेत शहर पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना बाल विवाहासंदर्भात माहिती दिली. नंतर चाइल्ड हेल्पलाइन कर्मचारी पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई, मुकेश मोरे, शहर पोलीस ठाण्याचे सुशील जाधव यांनी धाड घातली. शासनाने मुलीच्या वयाची चौकशी केली असता ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

नातेवाइकांकडून कारवाईत बाधा
सुरुवातीला नातेवाइकांनी मुलगी उपवर असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेचा दाखला आणि जन्म दाखला तपासल्यानंतर मुलीचे वय सोळा वर्षे असल्याचे समोर आले. चाइल्ड हेल्प लाइनने कडक पावले उचलत हा विवाह थांबवला. तसेच मुलगी व मुलाच्या पालकांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
तक्रार करण्याचे आवाहन
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सोबतच लहान मुलांच्या भविष्याशी खेळ आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ चाइल्ड हेल्प लाइन क्रमांक १०९८ ला द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.