mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

झोपेची डुलकी; समृद्धीवर चालक ठार : Dozing off at the wheel; driver killed on Samruddhi Expressway

शेअर करा :

Dozing off at the wheel; driver killed on Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोर चॅनेल नंबर २६९.४०० वर ४ ऑगस्टला पहाटे पाच वाजता मालवाहू ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक समोर चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.


Dozing off at the wheel; driver killed on Samruddhi Expressway

Dozing off at the wheel; driver killed on Samruddhi Expressway नागपूर कॉरिडोरवर ट्रक समोरील वाहनावर धडकला

मेहकर : समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नागपूर कॉरिडोर चॅनेल नंबर २६९.४०० वर ४ ऑगस्टला पहाटे पाच वाजता मालवाहू ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक समोर चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर सोबत असलेला क्लीनर हा किरकोळ जखमी झाला.

समृद्धी महामार्गावर डोणगावपासून जवळच नागपूर कॉरिडोर आहे. या ठिकाणी मुंबईकडून नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक आरजे-१२-जीडी-४४१२ चा चालक लेकराच (वय २६) रा. टेडीबगिया, ता. जि. आग्रा उत्तर प्रदेश याला झोपेची डुलकी लागली आणि भरधाव वाहनावरील ताबा सुटला. हे वाहन समोर जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून धडकले. या अपघातात ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. चालकाला गंभीर मार लागून तो जागेवरच गतप्राण झाला, तर क्लीनर सोनू निरंजन निषाद रा. फरे जि. मथुरा उत्तर प्रदेश हा किरकोळ जखमी झाला. यावेळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी बॅरिकेड्स लावले. जखमी क्लीनर याला उपचारासाठी ॲम्बुलन्सद्वारे पाठवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top