mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

MPSC पेपरफुटी प्रकरण: संभाजी ब्रिगेडचा तीव्र निषेध : MPSC paper leak case: Sambhaji Brigade strongly condemns the incident.

शेअर करा :

MPSC paper leak case: Sambhaji Brigade strongly condemns the incident. : MPSC पेपरफुटी प्रकरण: संभाजी ब्रिगेडचा तीव्र निषेध, सचिवाच्या तोंडाला फासले काळे

MPSC paper leak case: Sambhaji Brigade strongly condemns the incident.


बुलढाणा/मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भ्रष्ट व्यवस्थेचा जाहीर निषेध करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासले. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, संभाजी ब्रिगेडने सरकारला थेट इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर MPSC अध्यक्षांचाही नंबर लागेल.

आक्रमक आंदोलनाची पार्श्वभूमी:

गेल्या काही काळापासून MPSC च्या परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण हे त्याचेच एक ताजे उदाहरण आहे. या प्रकरणी सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. 3 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी सरकारला इशारा दिला होता की, जर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. सरकारने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची ही आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे.

“हा हल्ला व्यवस्थेवर, व्यक्तीवर नाही”:

बुलढाणा जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा हल्ला कोणत्याही व्यक्तीवर नाही, तर या सडलेल्या व्यवस्थेवर आहे.” काळे फासणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मुंबई अध्यक्ष सुहास राणे आणि योगेश पाटील यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारला थेट इशारा:

या घटनेनंतर प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “MPSC चा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि नालायक सरकारच्या तोंडाला काळे फासले आहे. महेंद्र हरपाळकरच्या थोबाडीत मारली आहे ती या सरकारला जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, त्यांना ज्या भाषेत समजते त्या भाषेत सांगितले पाहिजे.”

ॲड. आखरे यांनी पुढे बोलताना थेट इशारा दिला की, “MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही, तर पुढचा नंबर हा MPSC अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही.”

शिक्षणाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न:

यापूर्वी ॲड. आखरे यांनी आपल्या आवाहनात म्हटले होते की, “आज प्रश्न फक्त एका पेपरफुटीचा नाही, प्रश्न आहे शिक्षणाच्या विश्वासार्हतेचा, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, संविधानाने दिलेल्या समान संधीच्या अधिकाराचा.”

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनीही यावर भाष्य केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रकाश दिला. आता त्या प्रकाशाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही! शिक्षणावर अन्याय सहन नाही.”

दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे MPSC मधील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top