mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा ऐतिहासिक विजय : Historic victory for Shiv Sena in the Amravati Division Teachers’ Constituency

शेअर करा :

Historic victory for Shiv Sena in the Amravati Division Teachers’ Constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा ऐतिहासिक विजय: किरण सरनाईक ठरले विजयी

Historic victory for Shiv Sena in the Amravati Division Teachers' Constituency


बुलढाणा प्रतिनिधी  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार किरण रामराव सरनाईक यांनी एक मोठा आणि दणदणीत विजय संपादन केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या राजकीय लढतीत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत विजयश्री आपल्या नावावर केली. या विजयामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा प्रस्थापित झाली असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली होती. या मतदारसंघातील एकूण पस्तीस हजार आठशे दहा मतदारांपैकी तब्बल ९२.२५ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला होता. विभागातील एकाच वेळी ८१ केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. मतदानाची ही उच्च टक्केवारी पाहता शिक्षकांमध्ये आपल्या हक्काच्या प्रतिनिधीसाठी किती उत्सुकता होती हे स्पष्ट दिसून येते.

मतमोजणीची प्रक्रिया अमरावती येथील लोकशाही भवन येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे, निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि नियुक्त अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर काटेकोरपणे लक्ष ठेवून होते. अत्यंत पारदर्शक वातावरणात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली.

पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. या सर्वच फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम राखली होती. पहिल्या पसंतीची आठ हजार एक ६२ मते मिळवत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांच्यावर सुरुवातीपासूनच पकड निर्माण केली. मात्र, विजयासाठी आवश्यक असणारा सोळा हजार एकशे ३४ मतांचा निश्चित कोटा पहिल्या पसंतीच्या मोजणीत कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही.

कोटा पूर्ण न झाल्यामुळे नियमानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत रंजक आणि उत्कंठावर्धक ठरली. तब्बल तेहतीस तास चाललेल्या या मॅरेथॉन मतमोजणीनंतर अखेर चित्र स्पष्ट झाले. बाद फेरीत इतर उमेदवारांची मते वर्ग करत असताना किरण सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक असलेला कोटा यशस्वीरीत्या पूर्ण केला. अखेरच्या टप्प्यात सोळा हजार सहाशे त्रेसष्ठ मते मिळवत त्यांनी आपल्या विजयावर ο अधिकृत शिक्कामोर्तब केला.

या संपूर्ण निवडणुकीत त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि अपक्ष उमेदवार डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्यातही चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. मात्र, सरनाईक यांनी अचूक रणनीती आणि शिक्षकांचा मिळालेला पाठिंबा यामुळे विजयाची बाजी मारली.

निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी पोलीस यंत्रणा तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे विशेष आभार मानले. किरण सरनाईक यांच्या या विजयामुळे शिवसेना पक्षात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या समर्थकांनी ठीक ठिकाणी जल्लोष केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी किरण सरनाईक आता विधान परिषदेत कसा आवाज उठवतात, याकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top