mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सोलापूर GNM गैरप्रकार प्रकरणी बुलडाण्यात नर्सेसचे एक तास ठिय्या आंदोलन : Nurses in Buldhana stage a one-hour sit-in protest over the GNM irregularities case in Solapur

शेअर करा :

Nurses in Buldhana stage a one-hour sit-in protest over the GNM irregularities case in Solapur : सोलापूर GNM गैरप्रकार प्रकरणी बुलडाण्यात नर्सेसचे एक तास ठिय्या आंदोलन; उच्चस्तरीय चौकशीची मागणी कायम

Nurses in Buldhana stage a one-hour sit-in protest over the GNM irregularities case in Solapur


बुलडाणा, दि. ३० : सोलापूर येथील GNM परीक्षा पेपर तपासणीतील कथित गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने आज सकाळच्या सत्रात एक तास तीव्र निदर्शने करण्यात आली.

जिल्हा रुग्णालयासह जिल्हाभर निदर्शने

आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय मध्ये कार्यरत परिचारिकांनी एक तास काम बंद ठेवून निदर्शने केली. फेडरेशनने दिलेल्या राज्यव्यापी इशाऱ्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.

कालच्या मागण्यांवर आजही ठाम

फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलापूर येथे CAP राऊंडदरम्यान उत्तरपत्रिका महाविद्यालयाबाहेर नेण्यात आल्या का, सुरक्षिततेचे नियम पाळले गेले का, गुणनोंदीत फेरफार झाला का, या सर्व बाबींची CCTV फुटेज, वाहतूक नोंदी आणि मूळ उत्तरपत्रिकांच्या आधारे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. हा विषय हजारो GNM विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असल्याने शासनाने गांभीर्याने घ्यावा.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नाही

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी आणि परीक्षेच्या निकालाची विश्वासार्हता अबाधित ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने लवकरच चौकशी समिती जाहीर न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top