mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचा अवमान : Insult to the image of the Shiv Sena chief

शेअर करा :
Insult to the image of the Shiv Sena chief : शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचा अवमान; शिवसेना महिला आघाडी आक्रमक
Insult to the image of the Shiv Sena chief


              शायना एन.सी.वर कारवाईची मागणी 

बुलढाणा, दि. २० (प्रतिनिधी) : सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील एका पानावरून सुरू झालेल्या राजकीय वादात पत्रकार परिषदेदरम्यान शायना एन.सी. यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याचा आरोप करण्यात येत असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या कृतीचा शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.
Insult to the image of the Shiv Sena chief

बाळासाहेब ठाकरे हे लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे प्रतीक होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या छायाचित्राचा अवमान करणे ही बाब अत्यंत निषेधार्ह असून, कोणत्याही राजकीय वादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका महिला आघाडीने मांडली आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन शायना एन.सी. यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि अवमानाबद्दल शायना यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी तालुकाप्रमुख विजय इतवारे, कामगारसेना जिल्हाप्रमुख शेख रफीक शेख करीम, महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, शहर संपर्कप्रमुख सुनिल भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, श्रीकांत जाधव, नीलेश हरकल, अनिल राणा, राहुल जाधव, अमोल बेंडे, सोपान लाहे, गजानन गवई, पुजा शिंगणे, सविता राऊत, रोशनी गरड, भारती भारंबे, वैशाली मिसाळ, शारदा दाभाडे, स्वाती लोंढेकर, सुनिता दराखे, सुरेखा कदम, बेबी परिहार, निता चव्हाण, यशोदा देशमुख, रुपाली चव्हाण, भारती डागोर, सरला मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top