mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पोलिसांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा बुलढाण्यात : Police Divisional Sports Competitions in Buldhana

शेअर करा :

Police Divisional Sports Competitions in Buldhana : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी आणि अमलदारांसाठी घेण्यात येत असलेल्या विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा घेण्याचा मान बुलढाणा जिल्हा पोलीस दलास मिळाला आहे.


हजारावर खेळाडूंचा सहभाग : पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांचे सुयोग्य नियोजन : जय्यत तयारी

Police Divisional Sports Competitions in Buldhana
स्पर्धेसाठी सज्ज केलेले मैदान

बुलढाणा : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी आणि अमलदारांसाठी घेण्यात येत असलेल्या विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा घेण्याचा मान बुलढाणा जिल्हा पोलीस दलास मिळाला आहे. या स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये १ हजार ९४ खेळाडू आपले कसब दाखवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्पर्धा जल्लोषात पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन केले आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Police Divisional Sports Competitions in Buldhana

बुलढाण्यात होणारी ही ३७ वी स्पर्धा आहे. उत्साहात पार पडत आहेत. अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ अंतर्गत यजमान बुलढाणा पोलीस घटकासह यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती ग्रामीण तसेच अमरावती शहर (पोलीस आयुक्तालय) या सहा घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. क्रीडा रपर्धेमध्ये ॲथलेटीक्स पुरुष/महिला, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांदो, वुशू, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल महीला/पुरुष, हॅन्ड बॉल, खो-खो पुरुष/महिला, कबड्डी पुरुष/महिला, व्हॉलीबॉल पुरुष/महिला. क्रॉस कंट्री पुरुष/महिला दहा कि.मी., जलतरण या खेळांचा समावेश आहे. सदरच्या स्पर्धा बुलढाणा शहरातील पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रिडा संकूल, सहकार विद्या मंदिर, जिजामाता प्रेक्षागार मैदान तसेच जलतरण स्पर्धा खामगाव येथील जी.एस. कॉलेज येथे होणार आहे.

अमरावती परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी डॉ. महेश पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगावचे अपर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप तसेच बुलढाणा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार विशेष प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top