mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

A bear fell into a well : विहिरीत पडले अस्वल, वन विभागाने लढविली शक्कल!

शेअर करा :

A bear fell into a well : बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या एका मादी अस्वलाला तब्बल २८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे.

A bear fell into a well

बुलढाणा : बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या एका मादी अस्वलाला तब्बल २८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे.

मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर येथे गजानन रबडे यांच्या शेतातील विहिरीत चक्क एक मादी अस्वल पडल्याचे समोर आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी तात्काळ यंत्रणेला आदेश दिले आणि अस्वलाच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. सलग २८ तास हे ऑपरेशन सुरू होते. अखेर ८ जानेवारीला दुपारी १ वाजता त्या अस्वलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अस्वलाला बुलढाण्यातील राणी बागेत आणले गेले, जिथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेटागळे यांनी तिची प्राथमिक तपासणी केली. सुदैवाने मादी अस्वल पूर्णपणे सुदृढ असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला अंबाबरवा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक सरोज गवस, वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ आणि पंकज आळसपुरे यांच्या नेतृत्वाखाली संदीप माडवी, बाळासाहेब घुगे, पवन वाघ आणि त्यांच्या टीमने पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top