mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

A bus hit a two-wheeler : बसच्या पत्र्याने दुचाकीला अपघात; एक गंभीर

शेअर करा :

A bus hit a two-wheeler : राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बससेवेला प्रवासी वैतागले आहेत. अनेक बसेस जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. पाटोदा गावाजवळ एका बसचा पत्रा बाहेर निघाल्याने दुचाकीला धडकून एक जण गंभीर जखमी झाला, तर गाडीचालक किरकोळ जखमी झाला. चिखली तालुक्यातील पाटोदा येथे २३ जानेवारीला सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

बुलढाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बससेवेला प्रवासी वैतागले आहेत. अनेक बसेस जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. पाटोदा गावाजवळ एका बसचा पत्रा बाहेर निघाल्याने दुचाकीला धडकून एक जण गंभीर जखमी झाला, तर गाडीचालक किरकोळ जखमी झाला. चिखली तालुक्यातील पाटोदा येथे २३ जानेवारीला सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात भास्कर विष्णू खंदारे (वय ६५) हे जबर जखमी झाले असून, दुचाकी चालविणारे भिकाजी काकफळे (वय ३५) हे किरकोळ जखमी झाले. आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पाटोदा येथे ही घटना घडली. चिखली आगाराची पेनसावंगी ते चिखली ही नियमित बस पाटोदा गावातून जात असताना दुचाकीला बसचा बाहेर निघालेला पत्रा लागला. गावातील वळणावर अरुंद रस्त्यावर हा अपघात घडला.
बसच्या बाजूला सुमारे १२ इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला होता. हाच पत्रा मोटारसायकलवर मागे बसलेल्या भास्कर खंदारे यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या भंगार बसेसमुळे हा अपघात घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top