A get-together was held at DGI School, Mhasala Budruk : येथील डीजीआय स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
धाड : म्हसला बुद्रुक येथील डीजीआय स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सुमनबाई देविदासराव घोरपडे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नृत्य, गीत, नाट्यछटा तसेच विविध कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. अध्यक्षा घोरपडे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन प्राचार्य अमोल घोरपडे यांनी केले.


