mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

साखरखेर्डा तालुका निर्मितीकडे एक पाऊल; अप्पर तहसील कार्यालय मंजूर : A step towards the creation of Sakharkherda Taluka; Upper Tehsil Office approved

शेअर करा :

A step towards the creation of Sakharkherda Taluka; Upper Tehsil Office approved : साखरखेर्डा तालुक्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुका निर्मितीकडे एक महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे. 

A step towards the creation of Sakharkherda Taluka; Upper Tehsil Office approved

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश
सिंदखेड राजा : साखरखेर्डा तालुक्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुका निर्मितीकडे एक महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा भौगोलिक विस्तार असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा तालुका स्वतंत्र करण्यात यावा, यासाठी २०१४ ते २०२४ या कालावधीत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. विधिमंडळात अनेक प्रश्न यासाठी उपस्थित केले तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे, चंद्रकांतदादा पाटील, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी मागणी लावून धरली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.
स्वतंत्र तालुका निर्मितीचा निर्णय प्रलंबित असताना, तोपर्यंत साखरखेर्डा येथे महसूल भवन उभारून नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी तसेच इतर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी डॉ. खेडेकर यांनी केली होती. त्यानुसार आता येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाल्याने स्थानिक पातळीवर महसूलविषयक कामे मार्गी लागणार आहेत.
आंदोलने, मोर्चे 
साखरखेर्डा तालुक्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलने, मोर्चे व रास्ता रोको आंदोलनही केले होते. मात्र शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने प्रश्न प्रलंबित होता. आता अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार असल्याने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व महसूल कामांसाठी सिंदखेड राजा येथे वारंवार जाण्याची गरज उरणार नाही.
शासनाचे मानले आभार
या निर्णयाबद्दल माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाचे आभार मानले असून साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top