mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

५२ गुन्ह्यांची जंत्री : तीन अटल गुन्हेगारांविरुद्ध आवळला कारवाईचा फास : Action against three unsung criminals begins

शेअर करा :

Action against three unsung criminals begins : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा कसून शोध घेत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील तीन कुख्यात आरोपी सापडले. तब्बल ५२ गुन्हे या आरोपींविरुद्ध दाखल आहेत.


‘एलसीबी’ची धाडसी कारवाई : आरोपींना मराठवाड्यातून उचलले

शरद माळोदे
बुलढाणा : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा कसून शोध घेत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील तीन कुख्यात आरोपी सापडले. तब्बल ५२ गुन्हे या आरोपींविरुद्ध दाखल आहेत. मराठवाड्यातील परतूर व मंठा भागातून तिघांना उचलण्यात आले.
राजेंद्र बाबासाहेब राऊत (वय २५, रा. सेलूरोड परतूर, जि. जालना, राजेश शंकर शर्मा (वय ३०) रा. आनंदवाडी, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक व श्रीराम सोमनाथ सोनवणे (वय २०) रा. जातेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर या आरोपींना पोलीस पथकांनी मोठ्या शिताफीने पकडले. आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या आरोपींकडून सोन्याचे ब्रासलेट, कानातील टॉप्स, मोबाइल व कार असा ६ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी शेगावातील घरफोडी तसेच अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाणे, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबीचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पीएसआय अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, शेख चॉंद, गणेश पाटील, पोलीस शिपाई गजानन गोरले, निवृत्ती पुंड, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ राजू आडवे, ऋषी खंडेराव यांनी कारवाई फत्ते करण्यासाठी परिश्रम घेतले.


धीरजकुमारचे फोडले होते घर
उत्तर प्रदेशातील बरेलीचे रहिवासी धीरजकुमार रामपाल सिंग (वय ३५) यांचा हल्ली मुक्काम सध्या शेगावातील माऊलीनगरमध्ये आहे. ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्याचे ब्रासलेट, टॉप्स व कार चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक पोलीस आणि एलसीबीच्या टीमकडून समांतर तपास सुरू होता. या गुन्ह्याचा छडा लावताना आरोपी पोलिसांच्या हाती लागले.


एकाचे वय ३०, गुन्हे २७; दुसऱ्याचे वय २५ गुन्हे १७
एकाच्या नावावर २१, दुसऱ्याच्या १७ व तिसऱ्याच्या नावावर ८ असे ५२ गुन्हे दाखल आहेत. राजेंद्र राऊत याच्याविरुद्ध घरफोडी व चैन स्नॅचिंगचे १७ गुन्हे, राजेश शर्मावर घरफोडीचे २१, दरोड्याची तयारी १, चोरी ४, जबरी चोरी १ असे २७ गुन्हे दाखल आहेत. तसेच श्रीराम सोनवणे याच्याविरुद्ध दुचाकी चोरीच्या ८ गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींविरुद्ध वयाच्या जवळजवळ गुन्हे दाखल आहेत. 

Action against three unsung criminals begins

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top