mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अप्पर जिल्हाधिकारी, तीन नवीन तहसील सुरू होणार : Additional District Collector, three new tehsils to be started

शेअर करा :

Additional District Collector, three new tehsils to be started : बुलढाणा जिल्ह्यासाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि तीन नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. 

Additional District Collector, three new tehsils to be started
संग्रहित छायाचित्र

साखरखेर्डा, डोणगाव, लाखनवाड्यातून चालणार महसुली कामकाज : विविध पदांना मान्यता

बुलढाणा : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांची सोय विचारात घेऊन महसूल व वन विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी विभागाचा नवीन सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे. या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि तीन नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे ही नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये (लहान गट) कार्यान्वित होणार आहेत.

या ऐतिहासिक निर्णयामुळे महसूल विभागातील मंजूर पदांचा सर्वंकष आढावा घेऊन एकूण ३४,५७६ नियमित आणि १,३०० बाह्यस्त्रोतामार्फत भरावयाच्या पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्याची गणना ‘मोठ्या जिल्ह्यांच्या’ श्रेणीत करण्यात आली असून, अशा जिल्ह्यांसाठी नियमित १५१ पदे आणि बाह्ययंत्रणेमार्फत ११ पदे मंजूर करण्यात आली आहेत. नवीन निर्माण होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १३ नियमित पदे, तर नवीन लहान अप्पर तहसीलदार कार्यालयांसाठी प्रत्येकी ७ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करताना लोकसंख्या, तालुक्यांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांचा विचार केला जाणार आहे. अपर तहसीलदार कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करताना ‘मंडळ’ हा घटक महत्त्वाचा मानला असून, कोणत्याही एका मंडळाचे विभाजन दोन कार्यालयांत होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. या नवीन रचनेमुळे महसूल प्रशासनाच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन कार्यालयांच्या निर्मितीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना जमिनीचे दाखले, महसुली प्रकरणे आणि इतर शासकीय सेवांसाठी आता स्थानिक पातळीवरच सोय उपलब्ध होणार असून प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार

आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top