mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

प्रशासन ऐकत नाही; महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रहाद्वारे रोष

शेअर करा :

Administration not listening; Anger through Satyagraha in front of Mahatma Gandhi’s statue : शहरातील समस्यांचा पाढा वाचूनही प्रशासन दखल घेत नसल्याने वकिलांनी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा दिनी बैठा सत्याग्रह केला. 

Administration not listening; Anger through Satyagraha in front of Mahatma Gandhi's statue


बुलढाणा : शहरातील समस्यांचा पाढा वाचूनही प्रशासन दखल घेत नसल्याने वकिलांनी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा दिनी बैठा सत्याग्रह केला.
ॲड. प्रवीण सुरडकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ३० जानेवारी रोजी सत्याग्रह केला.
रविवारचा बाजार झाल्यानंतर म्हणजेच रविवारी रात्रीच साफसफाई करण्यात यावी, बाजारामुळे उद्भवणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, जुनी नळयोजना बंद करून नवीन नळजोडणी केल्यानंतर खोदकाम केल्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करावी, जलवाहिनीला लागलेली गळती रोखावी, यासह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र ५७ दिवसांचा कालावधी लोटलातरी पूर्तता झाली नाही. अखेर ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मादिनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरच बैठा सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनात
ॲड. प्रवीण सुरडकर, ॲडग़ुणवंत नाटेकर, ॲड. अमोलकुमार गवई, ॲड. अक्षय तोत्रे, ॲड. राम अंभोरे, ॲड. पी.बी. नरोटे, भागवत राजपूत, ॲड. मदन मगर, ॲड. राहूल मोरे, ॲड. राहूल तायडे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top