Ajitdada Pawar passes away : बारामतीजवळ बुधवार, २८ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले.

बुलढाणा : बारामतीजवळ बुधवार, २८ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. दादांसोबत असलेले अंगरक्षक, पायलट, प्लाइट अटेंडंट व अन्य अशा पाचजणांचादेखील मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
स्पष्ट आणि सडेतोड बोलणारा नेता, एक उमदे नेतृत्व महाराष्ट्राने गमाविल्याच्या शोकसंवेदना मान्यवरांसह सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. या घटनेत अजितदादा गेले, यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. मुंबई येथून उड्डाण घेतलेले विमान बारामती येथे पोहोचल्यावर दुर्घटनाग्रस्त झाले. धावपट्टीवर लॅडिंग होऊ न शकल्याने विमान कोसळले. यावेळी मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ उठले. या दुर्दैवी घटनेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.


