Ajitdadas ashes at his birthplace, Jijau : अजितदादा पवार यांचे विमान अपघातातील निधन सर्वांना चटका लावून गेले. बुलढाणा जिल्ह्याशी त्यांची नाळ जुळलेली होती. विशेषतः सिंदखेद राजा येथे जिजाऊ यांचे स्फूर्तीस्थान असल्याने दादा जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत. आज ते नाहीत, पण त्यांच्या अस्थी राजमातेच्या जन्मस्थळासमोर अर्थात राजवाड्यापुढे सर्वांच्या दर्शनासाठी आणल्या.

५ फेब्रुवारीला खडकपूर्णा जलाशयात विसर्जन
हयातीत दर्शन घेतले, तेथेच अस्थींचे दर्शन
सिंदखेड राजा : अजितदादा पवार यांचे विमान अपघातातील निधन सर्वांना चटका लावून गेले. बुलढाणा जिल्ह्याशी त्यांची नाळ जुळलेली होती. विशेषतः सिंदखेद राजा येथे जिजाऊ यांचे स्फूर्तीस्थान असल्याने दादा जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत. आज ते नाहीत, पण त्यांच्या अस्थी राजमातेच्या जन्मस्थळासमोर अर्थात राजवाड्यापुढे सर्वांच्या दर्शनासाठी आणल्या.
अमरावती येथील संजय खोडके यांच्याकडून अजितदादांचा अस्थीकलश नाझेर काझी यांनी स्वीकारला. हा कलश जिल्हाभर दर्शनासाठी जिल्हाभरात नेला जाणार आहे. ५ फेब्रुवारीला संत चोखा जलाशयात होणार अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिकलश दर्शन बुलढाणा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्अवांनी दर्सेशन घ्यावे, असे आवाहन नाझेर काझी आणि सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांनी केले आहे. अस्थिकलश यात्रेची सुरुवात जिजाऊ जन्मस्थान परिसरातून होणार आहे. लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संत चोखा सागर (खडकपूर्णा) जलाशय येथे पवित्र अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.