mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

तहसीलदारांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न : Attempt to put a stamp on the body of the Tehsildar

शेअर करा :

Attempt to put a stamp on the body of the Tehsildar : खामगावचे तहसीलदार सुनील पाटील कारवाईसठी रस्त्यावर उतरले असताना एका टिप्पर चालकांनी थेट वाहन अंगावर घालून त्यांना जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदारांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न : Attempt to put a stamp on the body of the Tehsildar

रेतीमाफियांची दादागिरी वाढली : पारखेड शिवारातील घटना

खामगाव : रेती तस्करांनी घातलेला हैदोस सर्वसामान्यांचे बळी घेत सुटला आहे. सुसाट वाहने पळवून घडणाऱ्या अपघातांमध्ये आजवर अनेकांचा जीव गेला. ही मालिका सुरू असतानाच रेतीमाफिया आता महसूल अधिकाऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील कारवाईसठी रस्त्यावर उतरले असताना एका टिप्पर चालकांनी थेट वाहन अंगावर घालून त्यांना जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारात सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी ही घटना घडली. 

दरम्यान, पलायन केलेल्या टिप्पर चालकाचा खुद्द तहसीलदार पाटील यांनी सिनेस्टाइल पाठलाग केला आणि रस्त्यावर वाहन आडवे लावून तस्करास पकडण्यात आले. तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव ते नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारातून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येते. या रेती तस्करांना लगाम घालण्यासाठी ३० मार्चच्या सकाळी खामगावचे तहसीलदार सुनील पाटील आपल्या खासगी वाहनाने गस्तीवर गेले होते. रेतीची अवैध वाहतूक करणारे एमएच-बीबी-७३१४ क्रमांकाचे टिप्पर दिसताच थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने टिप्पर थेट तहसीलदार पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी समयसुचकता बाळगत बाजूला होऊन आपला जीव वाचविला. यानंतर फरार झालेल्या टिप्परचालकाचा तहसीलदारांनी सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला.

खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर काही अंतरापर्यंत पाठलागाचा सिनेस्टाइल थरार सुरू होता. अखेर एका मुरुमाच्या ठिकाणी तहसीलदारांनी आपले वाहन आडवे लावून मुजोर चालकाला अडविले. या प्रकरणी अद्याप  पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top