Bee attack; Father and son injured : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाले. खामगाव तालुक्यातील बोरी आडगावनजीक अटाळी शेतशिवारात २८ फेब्रुवारीच्या सकाळी ही घटना घडली.

खामगाव : शेतात कामात मग्न असतानाच अचानक आलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पिता-पुत्रावर हल्ला चढविला. यात जागोजागी दंश केल्याने बापलेक गंभीर जखमी झाले. खामगाव तालुक्यातील बोरी आडगावनजीक अटाळी शेतशिवारात २८ फेब्रुवारीच्या सकाळी ही घटना घडली.
मधमाशांनी कडाडून चावा घेतल्याने मधुकर दौलत बोहरपी व त्यांचा मुलगा योगेश बोहरपी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २८ फेब्रुवारी सकाळी अटाळी शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. दोघेही कामात व्यस्त असताना मधमाशांनी त्यांना चावे घेऊन जखमी केले. बचावासाठी दोघेही इतरत्र धावले. मात्र, मधमाशांनी त्यांचा पाठलाग करून शरीरावर जागोजागी दंश केले. आरडाओरड केल्यानंतर शेजारील शेतकरी मदतीसाठी धावले.


