mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सावधान! भेसळयुक्त खवा, पनीर; Beware! Adulterated curd, paneer

शेअर करा :

सावधान! भेसळयुक्त खवा, पनीर;  विकणाऱ्यांवर करणार कठोर कारवाईचे आदेश : Beware! Adulterated curd, paneer

Beware! Adulterated curd, paneer

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

बुलढाणा : जिल्ह्यातील दूध उत्पादन, दुधाचा वापर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतील ताळमेळ तसेच भेसळयुक्त पदार्थांच्या वाढत्या तक्रारींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेसळयुक्त पदार्थ विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

अलीकडच्या काळात बाजारपेठेत पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडरचा वापर करून तयार केलेला पदार्थ ‘खवा’ म्हणून, तर पाम तेलापासून बनवलेले ‘चीज अ‍ॅनालॉग’ हे ‘पनीर’ म्हणून विकले जात असल्याचे समोर आले आहे. हे पदार्थ प्रामुख्याने गुजरात राज्यातून १० किलोच्या बॅगांमध्ये ‘स्पेशल बर्फी’ किंवा प्लास्टिक डब्यांमध्ये ‘हलवा’ या नावाने येतात. नियमानुसार, असे पदार्थ विकताना ते पाम तेल व मिल्क सॉलिडपासून बनवलेले आहेत, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रेते छुप्या पद्धतीने याची विक्री करत असून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी आपल्या मेनू कार्ड किंवा फलकावर अशा पदार्थांची स्पष्ट माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल, घटक आणि प्रकार नीट तपासावेत. कोणत्याही संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे किंवा १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top