BJP Foundation Day Celebrated with Enthusiasm in Dhad : धाडमध्ये उत्साहात भाजपा स्थापना दिन साजरा; ध्वजपूजनाने कार्यक्रमाची शोभा

धाड :
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त धाड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. राष्ट्रप्रेम, त्याग आणि समर्पणाची ४६ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत भाजपा ४७ व्या वर्षात पदार्पण करत असताना, या विशेष दिनाचे औचित्य साधून धाड येथे मा. आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्यालयात ध्वजपूजन करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव मा. डॉ. सुनिलजी जोशी, उपजिल्हाध्यक्ष श्रीरंग येंडोले, ज्येष्ठ कार्यकर्ते तेजराव मोहिते, रामचंद्र नादरकर, जिल्हा सरचिटणीस विष्णु पाटील वाघ, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष बबलू वाघुर्डे, उद्योजक मंगेश देविदास जाधव, माजी शहराध्यक्ष पवन कायस्थ, सागर भास्करराव जट्टे, सागर मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा https://mahadesha.com/
यावेळी डॉ. जोशी यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास आणि पक्षाची विचारधारा याबाबत मार्गदर्शन केले. तर श्रीरंग येंडोले यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनिल कुटे यांनी केले. शेवटी सर्वांना शुभेच्छा देत आणि “भारतीय जनता पार्टी” चा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन विष्णु वाघ यांनी मानले.


