mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गॅन्ट्रीसाठी समृद्धी महामार्गावर ब्लॉक : Block on Samriddhi Mahamarvag for gantry

शेअर करा :

Block on Samriddhi Highway for gantry : समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान एकूण ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद केली जाणार आहे.

Block on Samriddhi Highway for gantry

७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद : बुलढाणा-वाशीम जिल्ह्यात चालणार काम 

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील विविध टप्प्यांवर ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान एकूण ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद केली जाणार आहे.
समृद्धी महामार्गावरील किमी १७८+९०० ते २९०+४०० दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या मार्गावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येईल.
महामार्गावरील मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर ठराविक वेळेत परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिस, महामार्ग प्रशासन व सूचना फलकांचे पालन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

कामाचे वेळापत्रक असे

७ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे किमी १७८.९००, १७९.७५०, १८३.७००, १८५.५००, १९०.४००, २००.४००, २०५.४००, २०८.२००, २०८.८५०, २३८.५५०, २४२.६००, २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८००, २७०.४००, २८०.४००, २८१.४०० व २८३.९०० या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top