mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रक्तदानाच्या महायज्ञाने गाठला हजारांचा टप्पा : Blood donation drive reaches the thousand mark!

शेअर करा :

Blood donation drive reaches the thousand mark! : राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाने १००० पिशव्या रक्त संकलनाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. १ फेब्रुवारी रोजी सातारा येथून प्रारंभ झालेल्या रक्तदान शिबिरांतर्गत आतापर्यंत ४२ शिबिरे घेण्यात आली. शिबिरांना रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Blood donation drive reaches the thousand mark!


४२ रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा : राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाने १००० पिशव्या रक्त संकलनाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. १ फेब्रुवारी रोजी सातारा येथून प्रारंभ झालेल्या रक्तदान शिबिरांतर्गत आतापर्यंत ४२ शिबिरे घेण्यात आली. शिबिरांना रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या संयुक्त विद्यमाने संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरात १०० ठिकाणी ही रक्तदान शिबिरे होणार आहेत. छत्रपतींची भूमी सातारा येथून १ फेब्रुवारी रोजी शिबिराला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४२ रक्तदान शिबिरे संपन्न झाली आहेत. जवळपास अर्धी शिबिरे पूर्ण झाली असून या माध्यमातून १ हजार पिशव्या रक्त संकलन पूर्ण झाले आहे. तीन हजार पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रक्तदानाच्या महायज्ञाअंतर्गत एकाचवेळी राज्यात सर्वात जास्त रक्तदान शिबिरे घेण्याच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. शिबिरांमधून संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी रक्तदात्यांकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.


महाशिवरात्रीला मुस्लिमबांधवांचा रक्तदानात सहभाग

महाशिवरात्रीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी डोंगरशेवली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  मुस्लिमबांधवांनी रक्तदानात सहभाग घेतला. अफरोज पठाण, शेख हुसेन यांनी रक्तदान केले. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवल्यास रक्तदान शिबिरांचे आवाहन करण्यात येते. गरजू रुग्णांना लाभ मिळावा, या उद्देशाने राजर्षी शाहू परिवाराकडून नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

पती-पत्नीचा रक्तदानाचा आदर्श

रक्तदान महायज्ञाअंतर्गत राजर्षी शाहू मल्टिस्टेट शाखा गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथील शिबिरात पती-पत्नीने एकत्रपणे रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला. संदीप बाबुलाल दाणे आणि
आम्रपाली संदीप दाणे यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठ दान आहे. रक्ताचा एक थेंब रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करून योगदान देणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top