mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलडाणा जिल्हा परिषदेचा विनोबा पुरस्कार जाहीर आदर्श शिक्षिका भारती ससाने (डोंगरे) सन्मानित : Buldana Zilla Parishad Announces Vinoba Award; Ideal Teacher Bharati Sasane (Dongre) Honored.

शेअर करा :

Buldana Zilla Parishad Announces Vinoba Award; Ideal Teacher Bharati Sasane (Dongre) Honored. : बुलडाणा जिल्हा परिषदेचा विनोबा पुरस्कार जाहीर आदर्श शिक्षिका भारती ससाने (डोंगरे) सन्मानित

Buldana Zilla Parishad Announces Vinoba Award; Ideal Teacher Bharati Sasane (Dongre) Honored.

बुलडाणा (प्रतिनिधी):-

जिल्हा परिषद बुलडाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक’ (विनोबा ॲप) उपक्रमांतर्गत जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या महिन्यातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मोताळा येथील आदर्श शिक्षिका भारती नानाराव ससाने (डोंगरे) यांना प्रदान करण्यात आला.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गुलाबरावजी खरात, प्रकल्प अधिकारी मा. श्री. पी. एस. कोल्हे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. विकास पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन भारती ससाने यांना गौरविण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री. अकील शेख, श्री. अनिल देवकर, कार्यक्रम समन्वयक श्री. मोहन सुरळकर, वरिष्ठ जिल्हा समन्वयक श्री. शेख नजीर यांच्यासह शिक्षण विभागातील मान्यवर उपस्थित होते.

​नाविन्यपूर्ण अध्यापन आणि १५ वर्षांचा अनुभव

केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा क्र. १, मोताळा येथे कार्यरत असलेल्या भारती ससाने या मागील १५ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण न देता, त्या अगदी छोट्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांची नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्वतःहून मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती जिल्ह्यात इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

​वारसा शिक्षणाचा, ध्यास गुणवत्तेचा

माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंकडून लाभलेल्या शैक्षणिक वारशामुळे भारती ससाने यांच्या अंगी लहानपणापासूनच शैक्षणिक तळमळ आणि समाजसेवेचा गुण आहे. विनोबा ॲपच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम डिजिटल व्यासपीठावर मांडले, ज्याची दखल घेत त्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.

​या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top