mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर दरोडेखोरांची तुफान दगडफेक 

शेअर करा :

Buldhana Crime : बुलढाणा येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मेहकरकडे परतीच्या मार्गावर निघालेल्या मेहकर व लोणार तहसीलमधील महसूल कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांच्या जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागला. तीन वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच वाहनांच्या काचा फुटल्या. काचा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा बचाव झाला. चिखली ते मेहकर मार्गावर आमखेड फाट्याजवळ १६ जानेवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

बुलढाणा : येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मेहकरकडे परतीच्या मार्गावर निघालेल्या मेहकर व लोणार तहसीलमधील महसूल कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांच्या जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागला. तीन वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच वाहनांच्या काचा फुटल्या. काचा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा बचाव झाला. चिखली ते मेहकर मार्गावर आमखेड फाट्याजवळ १६ जानेवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

डोळ्याच्या वर दगड लागून महसूल सेवक धनराज दिगंबर शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. मेहकर तहसीलमधील निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर, अनंत साळवे, अजयसिंह जोहरे, धनराज शिंदे, विशाल इंगोले, मंगेश देशमुख, गणेश जाधव, नितीन जाधव, राहुल सपकाळ, रूपेश जुमडे, सुनील चनखोरे, अरूण साबळे, आरती साबळे, सविता भंडारे हे कर्मचारी १६ जानेवारी रोजी बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. दिवसभर विविध खेळांमध्ये भाग घेतल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला थांबून रात्री हे कर्मचारी तीन वाहनांद्वारे परत निघाले. वाशीम जिल्ह्यातील गौंडाळा येथील नितीन नवघरे यांच्या मालकीचे अधिग्रहित केलेले एमएच-२८-व्ही-४८१० क्रमांकाचे वाहन, तसेच त्यांच्याच मागे असलेल्या एमएच-२८-बीडब्ल्यू-९०९८ व एमएच-२८-सीसी-३३४६ क्रमांकाच्या वाहनांवर चिखली ते मेहकर मार्गावरील आमखेड फाट्याजवळ अज्ञात दरोडेखोरांनी लुटमार करण्याच्या उद्देशाने तुफान दगडफेक केली. या घटनेमुळे अधिकारी कर्मचारी प्रचंड भयभीत झाले. मात्र चालकांनी प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता मेहकरच्या दिशेने वेगात नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या कर्मचाऱ्यांच्या वाहनांशिवाय एक ट्रक आणि अन्य एका प्रवासी वाहनावर देखील दरोडेखोरांनी दगडफेक केली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, मेहकर तहसीलचे निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर (वय ५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपींवरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top