Warhad : महावितरणच्या अकोला परिमंडळामधील तीन जिल्ह्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले स्मार्ट मीटर (टीओडी) लावण्यात आले आहेत. अकोला परिमंडळात २ लाख ५८ हजार ७५ मीटर लावले असून, यामध्ये बुलढाणा जिल्हाच नंबर वन आहे. या जिल्ह्यात १ लाख ३० हजार ४२५ मीटर लावले आहेत. अकोला ८० हजार ६७१ आणि वाशीम जिल्ह्यात ४६ हजार ९७९ मीटरचा समावेश आहे.

Buldhana leads in smart meters; Meters installed in 1.5 lakh customers’ homes
वीज बिलाच्या तक्रारींचा
पाढा होणार बंद
बुलढाणा : महावितरणच्या अकोला परिमंडळामधील तीन जिल्ह्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले स्मार्ट मीटर (टीओडी) लावण्यात आले आहेत. अकोला परिमंडळात २ लाख ५८ हजार ७५ मीटर लावले असून, यामध्ये बुलढाणा जिल्हाच नंबर वन आहे. या जिल्ह्यात १ लाख ३० हजार ४२५ मीटर लावले आहेत. अकोला ८० हजार ६७१ आणि वाशीम जिल्ह्यात ४६ हजार ९७९ मीटरचा समावेश आहे.
स्मार्ट मीटरद्वारे स्वयंचलित मीटरचे वाचन होत असल्याने अचूक बिले ग्राहकांना मिळू लागली आहेत. वीज वापर वीज ग्राहकांना दर तासाला मोबाइलवर पाहायला मिळतो. त्यामुळे वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवता येते.
डिजीटल युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक आणि वेळेत बिल देण्यास उपयुक्त ठरणारे महावितरणचे स्मार्ट (टीओडी) मीटर हे वीज ग्राहकांसाठी पर्याय नसून आवश्यकता आहे. स्मार्ट मिटरमुळे सरासरी वीज बिल, मीटरचे वाचन झाले नाही या व अशा अनेक तक्रारीच उरणार नाहीत.
इज ऑफ लिव्हींगनुसार वीज ग्राहकांना तक्रार शून्य सेवा देण्यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार आहे. एकूणच वीज ग्राहकांसाठी फायद्याचे असणारे मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाने केले आहे.
कामाला गती
अचूक वीजबिलासोबत दिवसा वीज वापराचा लाभ वीज ग्राहकांना मिळावा, यासाठी जीनस कंपनीसोबत महावितरणने टीओडी मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली आहे. परिमंडळात टप्प्याटप्प्याने सर्वच वर्गवारीतील (कृषी ग्राहक वगळून) वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.
… तरच दिवसा वीज वापराची सवलत
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रूपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीज दरानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत १ जुलै २०२५ पासून सुरू केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

