mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Buldhana News : ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवासी

शेअर करा :

Buldhana News : ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उतरविल्याने ४० प्रवाशांचे प्राण वाचले. काहींना किरकोळ दुखापत झाली. बुलढाणा ते धाड मार्गावर वरुडनजीक २२ जानेवारीच्या सायंकाळी मोठा अपघात टळला.

Buldhana News

 

शरद माळोदे / बुलढाणा : ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उतरविल्याने ४० प्रवाशांचे प्राण वाचले. काहींना किरकोळ दुखापत झाली. बुलढाणा ते धाड मार्गावर वरुडनजीक २२ जानेवारीच्या सायंकाळी मोठा अपघात टळला.
बुलढाणा आगाराची एमएच-२०-बीएल-१८०६ क्रमांकाची बस धाड येथे गेली होती. वरुड, सोयगाव, जामठीमार्गे बुलढाण्याकडे येत असताना वरूड गावाजवळ बसचे ब्रेक निकामी झाले. अपघाताची शक्यता लक्षात घेत चालक नंदू शिंपणे यांनी मोठे धैर्य ठेवत वेगावर नियंत्रण मिळविले. पुढे काही अंतरावर गाव असल्याने ग्रामस्थांनाही जीवाचा धोका होऊ शकतो म्हणून चालकाने बस रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात उतरविली. त्यामुळे ४० प्रवाशांचा जीव वाचला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top