mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सीसीटीएनएसमध्ये बुलढाणा पोलीस महाराष्ट्रात अव्वल. : Buldhana Police Rank First in Maharashtra in CCTNS

शेअर करा :

Buldhana Police Rank First in Maharashtra in CCTNS : सीसीटीएनएसमध्ये बुलढाणा पोलीस महाराष्ट्रात अव्वल.राज्यात उंचावली पोलिसांची प्रतिमा

Buldhana Police Rank First in Maharashtra in CCTNS
सीसीटीएनएसमध्ये बुलढाणा पोलीस महाराष्ट्रात अव्वल

बुलढाणा : जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएसचे जिल्ह्याचे प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी आपल्या टीमसह तसेच जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र राज्याच्या पटलावर क्रमांक एकवर आले आहे. सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानांकनामध्ये राज्यातून जिल्हा अव्वल आला आहे. डिसेंबर २०२५ नंतर जानेवारी २०२६ या महिन्यात सलग दोनवेळा राज्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस प्रणालीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ पोलीस स्टेशन संगणकीकृत करण्यात आले आहे. संपूर्ण कामकाज ऑनलाइन सुरूकेले जात आहे. राज्यस्तरावर पोलीस दल उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. सीसीटीएनएस प्रणालीचे जानेवारीचे गुणांकन नुकतेच जाहीर झाले. यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्यात आले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या गुणांकनात जिल्हा पोलीस दलाने डिसेंबर २०२५ मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. जानेवारी २०२६ च्या गुणांकनातही २०१ पैकी २०१ गुण मिळवले.

गेल्या सहा महिन्यांपासून बुलढाणा पोलीस दलाचे मानांकन हे १ ते ५ क्रमांकादरम्यान आहे. ही उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तथा सीसीटीएनएस प्रणालीचे नोडल अधिकारी अमोल गायकवाड, खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, सीसीटीएनएस प्रभारी अधिकारी एपीआय सचिन पाटील, पोलिस अंमलदार सुनील वाघमारे, किरण चिंचोले, दीपमाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, संतोष कायंदे, दीपाली खर्चे, मनीषा चोरघडे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे अधिनस्त अंमलदार जीवन उबरहंडे, योगेश कुवारे, संदीप करुटले, सतीश शिंदे, गणेश काकड आणि सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची या यशामागे मेहनत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top