Buldhana to Trimbakeshwar bus service launched for devotees : जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेत एसटी महामंडळाच्या बुलढाणा आगाराने बुलढाणा ते त्र्यंबकेश्वर बस सुरू केली आहे. यामुळे भाविक व अन्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलढाणा : जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेत एसटी महामंडळाच्या बुलढाणा आगाराने बुलढाणा ते त्र्यंबकेश्वर बस सुरू केली आहे. यामुळे भाविक व अन्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून आणि शिवसेना विभागप्रमुख संजय तोटे, सागवन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोपाल भाग्यवंत, सुखदेव चिकटे, विजय एडके, राजू पडोळ, अनिल राणा, बबन शेळके यांच्या प्रयत्नातून बुलढाणा ते त्र्यंबकेश्वर बससेवा सुरू करण्यात आली. चालक विलास मनगटे व वाहक गणेश वाघ यांचा धाड नाका येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी हर्षल पायगव्हाण, सागर काळवाघे, ज्ञानेश्वर पिसे, गणेश धायडे, निवृती तायडे, शिवाजी एडके, परमेश्वर पाहुरुपे उपस्थित होते. या बस सेवेबद्दल राज्य परिवहन मंडळाचे आभार मानण्यात आले. भाविक आणि प्रवाशांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी सोयीस्कर आणि परवडणारी सुविधा उपलब्ध झाली आहे.
सोपा, सुरक्षित प्रवास
नवीन बस सेवेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांना आता छत्रपती संभाजीनगर, येवला, नाशिकमार्गे थेट त्र्यंबकेश्वर पोहोचता येणार आहे. यापूर्वी प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते, ज्यामुळे खर्च आणि त्रास वाढत होता. आता एसटीच्या ‘लालपरी’ने हा प्रवास सोपा, सुरक्षित आणि स्वस्त झाला आहे. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही एक मोठी भेट ठरली आहे.

