Buldhana’s Shruti Tayde is the twenty-second from the country : बुलढाण्याची श्रृती तायडे देशातून बावीसावी.

बुलढाणा : भारतीय कंपनी आसीएसआय संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या सीएस कोर्सच्या पहिल्या परीक्षेत नोव्हेंबर २०२४ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर, आता सीएस एक्झुकेटीव्ह या दुसऱ्या फेरीच्या परीक्षेत बुलढाण्याची श्रुती वैशाली दिलीप तायडे उत्तीर्ण झाली. तिने भारतातून २२ वा क्रमांक पटकाविला.
भारतातील हजारो विद्यार्थी या परीक्षेचा अर्ज दाखल करतात. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात दोन्ही गट उत्तीर्ण करून श्रृती पुढील फेरीसाठी पात्र ठरली. आठपैकी तीन विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले. ती सध्या बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. तसेच या परीक्षेसाठी तिने पीडब्ल्यू फिजिक्स वाला यांचा ऑनलाइन कोर्स केला होता.
तिच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाइक, पीडब्ल्यूचे शिक्षक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश गवई, प्रा.जे.जे. जाधव, प्रा.डॉ. सुबोध चिंचोले तसेच सर्व प्राध्यापकांनी तिचे कौतूक केले.

