mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विंचू परिवारावर गुन्हा दाखल : Case registered against Vinchu family

शेअर करा :

Case registered against Vinchu family : विंचू परिवाराने सुनेचा छळ केल्याची घटना शेगाव येथे घडली.

Case registered against Vinchu family

छळल्याने रागिणी संतप्त

खामगाव : विंचू परिवाराने सुनेचा छळ केल्याची घटना शेगाव येथे उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रागिणी रोशन विंचु (वय २३) असे पीडित सुनेचे नाव आहे. सध्या ती खामगाव येथील वाडी येथे राहते. १३ जानेवारी २०२६ पूर्वी शेगावातील जगदंबा नगर आपला पतीसह सासरच्या लोकांनी छळ केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रोशन धन्यवाद विंचु (वय ३०), धन्यवाद समाधान विंचु (वय ६०), प्रिया धन्यवाद विंचु (वय ५२) व स्नेहा धन्यवाद विंचु (वय ३३), सर्व रा. गल्ली क्र. 6, जगदंबा नगर, शेगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला तक्रार निवारणकडून कारवाई

सासरच्या लोकांकडून आपला छळ होत असल्याने राहिणीने खामगाव येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. कक्षाच्या वतीने समुपदेशन करून समेट घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु सासरची मानली नाही. अखेर महिला तक्रार निवारण कक्षाकडून अहवाल पाठविण्यात आला. त्यावरून २६   फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिता कलम ८६, ३५२, ३ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ विनोद शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top