mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

स्मशानभूमीत सिमेंटचे बाक भेट : Cement bench found in cemetery

शेअर करा :

Cement bench found in cemetery : गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त मागासवर्गीय स्मशानभूमी येथे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने नवचेतना ग्रुपच्या सहकार्याने स्मशानभूमी परिसरात चार सिमेंट खुर्च्या बसविण्यात आल्या.

Cement bench found in cemetery
नवचेतना ग्रुप उपक्रम

रिसोड : गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त मागासवर्गीय स्मशानभूमी येथे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने नवचेतना ग्रुपच्या सहकार्याने स्मशानभूमी परिसरात चार सिमेंट खुर्च्या बसविण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे सभापती संतोष चऱ्हाटे व वरिष्ठ पत्रकार पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष बाजड मुंबई, ईश्वर गायकवाड, शिवाजीराव शेलार, संतोष हांडे, भगवान काका, गणेश कांबळे, शिवम कांबळे, ओमकार बाजड उपस्थित होते. या उपक्रमामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली असून परिसरात स्वच्छता व सुव्यवस्थेलादेखील चालना मिळाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत नवचेतना ग्रुपने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. नवचेतना ग्रुप रिसोड यांच्या वतीने विनोद बांगर, गोविंदा गायकवाड, सुभाष बाजड, अतुल खवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व नवचेतना ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. भविष्यातही अशा उपक्रमांतून समाजासाठी उपयुक्त कामे करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top