mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सैलानी यात्रेसाठी वाहतुकीत बदल : Changes in transportation for tourism

शेअर करा :

Changes in transportation for tourism : सैलानी यात्रेसाठी वाहतुकीत बदल.

Changes in transportation for tourism

बुलढाणा
सैलानी बाबांच्या ११९ व्या यात्रा महोत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतूक मार्गांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
२५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत हे निर्बंध लागू राहतील.

२५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत महोत्सव साजरा होत असून, २ मार्च रोजी होळी उत्सवात नारळांची होळी, ८ मार्च रोजी संदल मिरवणूक आणि १२ मार्च रोजी फातेहाखानीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे ४ ते ५ लाख भाविक सैलानी येथे येणार आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या विनंतीनुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा वाहतूक मार्ग क्रमांक २६ वरील वाहतुकीचे वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

पर्यायी मार्ग :
1) सध्याचा मार्ग : रायपूर – पिंपळगाव सराई – सैलानी – ढासाळवाडी – दुधा.
> पर्यायी मार्ग : रायपूर – मातला – केसापूर – माळवंडी – दुधा
2) सध्याचा मार्ग : दुधा – घाटनांद्रा – ढासाळवाडी – सैलानी – पिंपळगाव सराई
> पर्यायी मार्ग : दुधा – माळवंडी – केसापूर – मातला – रायपूर

या कालावधीत एस.टी. बसेस, जड वाहतूक तसेच खाजगी वाहतूक यांना पर्यायी मार्गाचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३१ अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल. महोत्सव काळात भाविकांनी प्रशासन व पोलीस विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आदेशाद्वारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top