mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन : Citizens stage Sholay-style protest by climbing on water tanks to demand roads

शेअर करा :

Citizens stage Sholay-style protest by climbing on water tanks to demand roads : रिसोड साखरा रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन.

Citizens stage Sholay-style protest by climbing on water tanks to demand roads

रिसोड : रिसोड साखरा मार्गावरील साखरा फाटा ते आगरवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या दैयनीय अवस्थेला कंटाळून दिनांक २४  फेब्रुवारी सकाळी ९  वाजता आगरवाडी व परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने  आंदोलन करून  प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर आंदोलनाची तीव्रता बघता या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन लेखी  स्वरूपात आश्वासन देत सदर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागणी जर पूर्ण होत नाही तर येत्या १  मेला महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून  प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत रस्ता करण्याची मागणी केली. सदर आंदोलनामध्ये एका महिलेचा समावेश होता जी स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून अन्य आंदोलकांना सोबत उपस्थित होती. सदर आंदोलनामध्ये अर्चना सचिन गांजरे संचालिका गंगोत्री वृद्धाश्रम केलसुला,पांडुरंग वायभासे अगरवाडी सरपंच सचिन इप्पर, सचिन गांजरे,भागेश मुंढे,संतोष मुंढे,कैलाश मुंढे,गोपाल वायभासे
तसेच आगरवाडी व परिसरातील गावकरी  होते. विदर्भ मराठवाडा ला जोडणारा सदर रस्ता गेली दोन दशकापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे अक्षरशः चाळणी झालेल्या साखरा फाटा ते आगरवाडी पर्यंतच्या दोन किलोमीटर रस्त्याची अक्षरशा  चाळणी झालेली आहे. रस्त्यामध्ये खड्डे की खड्डे मध्ये रस्ता हे कळत नाही. या रस्त्यावर शाळकरी विध्यार्थांच्या  व्यतिरिक्त अन्य प्रवासी वाहनधारक शेतकरी प्रवास करत असतात. या रस्त्यामधिल खड्ड्यामध्ये पडून अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे. अनेक वेळा मागणी करून सुद्धा  या ठिकाणी  प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

Citizens stage Sholay-style protest by climbing on water tanks to demand roads

सदर आंदोलनाच्या वेळी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, पोलीस उपनिरीक्षक कदिर खान,पो.कॉ.प्रशांत राजगुरू, पो.कॉ राजेश गांगवे यांच्यासह पोलिसांचा ताफा उपस्थित होता. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत  प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. सदर आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आंदोलन शांतपणे पार पडले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top