mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

श्रमसंहितेविरुद्ध सीटूने पाळला काळा दिवस : CITU observed a ‘Black Day’ against the Labour Codes.

शेअर करा :

CITU observed a ‘Black Day’ against the Labour Codes. : श्रमसंहितेविरुद्ध सीटूने पाळला काळा दिवस.

CITU observed a 'Black Day' against the Labour Codes.
कामगारांना गुलामीच्या खाईत लोटले : पंजाबराव गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा : देशातील कोट्यवधी कामगारांनी अन्यायकारक आणि भांडवलधार्जिण्या चार श्रमसंहितेविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. १ एप्रिल रोजी सीटू संघटनेच्या वतीने काळा दिवस पाळून श्रमसंहितेचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

गेल्या शंभर वर्षांत कामगारांनी लढून मिळविलेल्या ४४ कामगार हिताच्या कायद्याची सरकारने प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी देशव्यापी संप केला. रस्त्यावर उतरून देशपातळीवर मोठमोठी आंदोलने केली. नुकतेच १२ फेब्रुवारी रोजी सीटूसह देशातील अखिल भारतीय स्तरावर दहा प्रमुख कामगार संघटनेच्या वतीने चार श्रमसंहितेविरोधात एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. केंद्र सरकारने कामगारांच्या कुठल्याही आंदोलनाकडे लक्ष न देता संसदेमधील आपल्या बहुमताच्या जोरावर कामगार विरोधी चार श्रमसंहिता मंजूर करून सरकारने देशातील कोट्यवधी संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण केले. त्यांना गुलाम बनविण्याची एक प्रकारची सूटच मालक वर्गाला दिली, असा आरोप सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी यावेळी केला.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगारविरोधी चार श्रमसंहितेची १ एप्रिलपासून अमंलबजावणी करण्याचे आदेश देशातील सर्व राज्यांना दिले आहेत. १ एप्रिल हा दिवस कामगारांसाठी काळा दिवस म्हणून देशातील कामगार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात सरकारच्या विविध योजनेत महत्त्वाची कामे करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका, शालेय पोषण आहार कामगार महिलांनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने केली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

जिल्ह्यातील बुलढाण्यासह इतरही तालुक्यात हजारो महिला कामगारांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. या आंदोलनात पंजाबराव गायकवाड, प्रतिभा पाटील, शारदा इंगळे, रेखा इंगळे, दीपाली एंडोले, सुरेखा डोंगरे, छाया खंडारे, नर्मदा शिरसाट, सरला अंभोरे, साधना गवई, संगीता लहाने, किरण नरवाडे, अपर्णा किलबिले, सविता खिल्लारे, अनिता ठाकरे, कांता दराडे, सुवर्णलता सुरडकर सहभागी झाल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top