Contractors arbitrariness; Womans hunger strike : ठेकेदाराने मनमानीपणे कामे केल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई राठोड यांनी लोणार पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे.

लोणार : देऊळगाव कुंडपाळ येथील ग्रामपंचायतीअंतर्गत निकृष्ट दर्जाची केलेली विकासकामे, केलेला अपहार तसेच कागदोपत्री केलेल्या कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई परशुराम राठोड यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनास गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. ठेकेदाराच्या मनमानीविरुद्ध तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न केल्याने उपोषण करावे लागत असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे केली नाहीत. निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालय व अन्य कामे कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.

