mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पहिल्याच पेपरला कॉपीबहाद्दर रस्टीकेट : Copy-worthy rustication on the very first paper

शेअर करा :

Copy-worthy rustication on the very first paper : बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला कॉपी करणाऱ्या ‘ मुन्नाभाई ‘ विद्यार्थ्यास मेहकर तहसीलदारांच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले. त्या विद्यार्थ्यास कॉपीमुक्त अभियानअंतर्गत निलंबित करण्यात आले आहे.

Copy-worthy rustication on the very first paper
हिवरा खुर्द येथील परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर भरारी पथक.

मेहकर तहसीलदारांच्या भरारी पथकाची कारवाई

आसिफ शाह
मेहकर : बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला कॉपी करणाऱ्या ‘ मुन्नाभाई ‘ विद्यार्थ्यास मेहकर तहसीलदारांच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले. त्या विद्यार्थ्यास कॉपीमुक्त अभियानअंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. हिवरा खुर्द येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. यामुळे कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बारावीच्या परीक्षेला १० फेब्रुवारीपासून ११७ परीक्षा सुरुवात झाली आहे. आज इंग्रजी विषयाचा पेपर होता. केंद्रांवर ३५२११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदन पत्र भरले होते. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची नजर आहे. याशिवाय बैठे पथक तसेच आठ भरारी पथके कॉपीमुक्त अभियानासाठी तैनात आहेत. या पथकांपैकी मेहकर तहसीलदार नीलेश मडके यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटीत देऊन कसून तपासणी केली. आपा पाटील विद्यालय, नायगाव दत्तापूर, सरस्वती विद्यालय, जानेफळ, श्री शिवाजी विद्यालय, मेहकर व हिवरा खुर्द येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रांची तपासणी करण्यात आली. यातील हिवरा खुर्द च केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. तहसीलदार मडके यांनी या विद्यार्थ्यास तडकाफडकी निलंबित केले.
या पथकामध्ये महसूल सहाय्यक प्रवीण परमाळे, अश्विन ठाकरे, बंडू गोरे, महसूल सेवक मंगेश देशमुख, महसूल सेवक दीपक अवचार यांचा समावेश होता.
मेहकर तालुक्यातील सर्व शाळांच्या केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. प्रत्येक पेपरला कॉपी करताना विद्यार्थी आढळून आल्यास निलंबित करावे, असे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.

… तर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व बैठ्या पथकावरही कारवाई
तहसीलदारांचा इशारा

कोणत्याही प्रकारे परीक्षेत  कॉपी करू नये. कुणी विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्यासोबतच परीक्षा केंद्र प्रमुख, परीक्षा खोलीवरील  पर्यवेक्षक आणि बैठे पथकावर देखील कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा तहसीलदार नीलेश मडके यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top