mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

१२ लाखांचा भ्रष्टाचार; ग्रामसेवक गणेश पायघन निलंबित : Corruption of Rs 12 lakh : Gram Sevak Ganesh Paighan suspended

शेअर करा :

Corruption of Rs 12 lakh; Gram Sevak Ganesh Paighan suspended : तालुक्यातील कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक)गणेश पायघन यांना बीडीओंनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.

Corruption of Rs 12 lakh : Gram Sevak Ganesh Paighan suspended

शरद माळोदे

बुलढाणा : तालुक्यातील कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक)गणेश पायघन यांना बीडीओंनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.
गणेश पायघन यांच्याविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात पायघन दोषी आढळले. पधंराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय केल्याबाबत तक्रारी होत्या. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी (पंचायत) दप्तर तपासणी केली असता धक्कादायक बाबी आढळून आल्या.
गणेश पायघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले असता ६ जानेवारी २०२६ व २२ जानेवारी २०२६ ला दिलेला खुलासा असमाधानकारक होता. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ कलम ३ चा भंग केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईस पायघन पात्र ठरले.

स्वत:सह नातेवाइकांच्या खात्यात रक्कम वर्ग


तपासणी अहवालानुसार पंधराव्या वित्त आयोगातून खर्च केलेली रक्कम संबंधित पुरवठादारांना दिल्यानंतर त्याच्या खात्यामधून पायघन यांनी ११ लाख ५५ हजार रुपये स्वत:च्या आणि नातेवाइकांच्या बॅंक खात्यात वळती केल्याचे बॅंकेच्या तपशिलावरून निदर्शनास आले.

कामे न करताच काढली देयके


पंधराव्या वित्त आयोगामधून ज्या कामाची देयके अदा केली, त्याची नोंद नमुना नंबर ५ ला आढळली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामे न करता बोगस देयके तयार करून खर्च नोंदविल्याची गंभीर बाबदेखील चौकशीत समोर आली.
शासनाची फसवणूक
ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन यांचे हे कृत्य महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियमांचा भंग करणारे असल्याने तसेच शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top